पुण्यात रात्रभर हाय व्होल्टेज ड्रामा! ‘टप्पा वाढी’च्या पत्रासाठी शिक्षकांना वेठीस धरले; अखेर शिक्षक आमदार-च्या मध्यस्थीनंतर रात्री 12 वाजता ‘हा’ निर्णय!
पुणे दि २७/९/२०२५ : विद्येच्या माहेरघरात शिक्षकांना वेठीस!
‘पुणे तिथे काय उणे’ अशी ख्याती असलेल्या पुणे शहरात आता शिक्षण मंडळाच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातच शिक्षकांना त्यांच्या हक्कासाठी रात्री उशिरापर्यंत ताटकळत उभे राहावे लागले. पुणे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ विभाग खासगी प्राथमिक शाळांना ‘टप्पा वाढी’ची (ग्रेड/टप्पा वाढ) पत्रे देण्यास पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाला एकाही शाळेला हे महत्त्वाचे पत्र देता आले नाही.
शिक्षकांना वेठीस : १५ दिवसांपासून तपासणीचा घोळ!
मागील पंधरा दिवसांपासून शाळांच्या कागदपत्रांची तपासणी चालू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात होते. त्यानंतर शिक्षण प्रमुख श्रीमती सुनंदा वाखारे मॅडम यांच्याशी तीन दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेत, शुक्रवारी (दिनांक २६ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंत सदर पत्रे निश्चितपणे देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते.
BREAKING: नांदेडमध्ये ‘रेड अलर्ट’चा इशारा! प्रशासनाचा ‘हा’ सर्वात मोठा निर्णय; आज शाळा, कॉलेज बंद! विद्यार्थी-पालकांनो, त्वरित वाचा.
रात्री १२ वाजेपर्यंत ठिय्या, एकही अधिकारी फिरकला नाही!
या आश्वासनामुळे पुणे शहरातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षण संघटनांचे पदाधिकारी आज (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजेपासून शिक्षण मंडळात पत्रे स्वीकारण्यासाठी उपस्थित झाले होते. मात्र, रात्रीचे बारा वाजून पाच मिनिटे झाले तरी एकाही शाळेला पत्र देण्यात आले नाही! दिवसभर विभागाचा एकही प्रमुख अधिकारी शिक्षकांना भेटून ‘आज पत्र देता येणार नाही’ असे साधे सांगायलाही आला नाही, ज्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड संताप होता. रात्री उशिरापर्यंत शिक्षण मंडळात पोलीस, सुरक्षारक्षक आणि पोलीस व्हॅन उपस्थित होते.
कर्नाटक सरकारला छत्रपती शिवाजी महाराज बद्दल इतका द्वेश का?
आमदारांनी साधला संपर्क, तरीही पत्र मिळेना!
शिक्षकांचे हे तीव्र आंदोलन पाहून कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आमदार योगेश टिळेकर यांनी रात्री उशिरा शिक्षण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र, या उच्चस्तरीय चर्चेनंतरही टप्पा वाढीचे एकही पत्र शिक्षकांना मिळाले नाही.
पहाटे १२ वाजता आश्वासन दिल्याने, आंदोलन स्थगित!
या नंतर घटनास्थळी शिक्षण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी माननीय परदेशी सर हे उपस्थित शिक्षक आणि शिक्षिका यांच्याशी चर्चा करण्या-साठी आले. त्यांनी खालील प्रमाणे आश्वासन दिले:
- सोमवार, दि २९ सप्टेंबर रोजी जास्तीत जास्त म्हणजे ७० टक्के शाळांची पत्रे दुपारी बारा वाजे पर्यंत मेल द्वारे (E-mail) पाठवली जातील.
- उर्वरित शाळांची पत्रे सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी सकाळी देण्यात येतील.
दिलेल्या आश्वासन नंतर, सर्व शिक्षक-शिक्षिका आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन रात्री ठीक १२ वाजून ५ मिनिटांनी सदरचे मागणी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा विरुद्ध शिक्षकांचा संघर्ष मात्र अजून संपलेला नाही!
Read Also:
- TET संदर्भात नवीन अपडेट | शेकडो शिक्षकांचा पगार अडकणार. वेतन अधीक्षकांची शाळांना महत्त्वाचे आदेश
- नियुक्तीचे दस्तावेज शालार्थ प्रणाली मध्ये अपलोड करा. नाहीतर पगार थांबेल |
- मोठी बातमी २०%,४०%६०% आणि आता ८०% मोठी बातमी २०%,४०%६०% आणि आता ८०% विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!
- स्मार्ट मीटर की स्मार्ट फसवणूक? वाढीव बिलांमुळे ग्राहक संतापले!