अंशतःअनुदानित शिक्षकांसाठी खुशखबर बातमी! आता 20%ते 80% अनुदानित शाळांतील शिक्षकांना मिळणार पूर्ण वैद्यकीय भरपाई!

अंशतःअनुदानित शिक्षकांसाठी खुशखबर बातमी!
Spread the love

मुंबई दिनांक २४/०९/२०२५ : राज्यातील अंशतःअनुदानित शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी! सध्या फक्त १०० टक्के अनुदानित शाळांतील शिक्षकांना शासनाकडून वैद्यकीय उपचारांसाठी भरपाईचा लाभ मिळतो. पण आता यात मोठा बदल होणार आहे. अंशतः अनुदानित शाळांमधील – म्हणजे २० टक्के ते ८० टक्के अनुदानित – सर्व शिक्षकांना हा लाभ मिळावा यासाठी आरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमली जाणार आहे. ही घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे. या निर्णयामुळे लाखो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाची वचनबद्धता दिसून येते.

राज्यातील अंशतःअनुदानित शिक्षकांसाठी आनंदाची बातमी

आरोग्य भवनात नुकतीच झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधींसोबत वैद्यकीय भरपाईच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत माजी आमदार कपिल पाटील, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत नव्हता

खास बाब म्हणजे राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती आधीपासूनच चालू असून यामध्ये फक्त शंभर टक्के अनुदानित शाळांना व त्यातील कर्मचाऱ्यांसाठी उपचारांचे खर्च शासन करत होता.
ज्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कुठलीही आर्थिक चिंता नव्हती. पण अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत नव्हता. आता 20 टक्के ते 80 टक्के अंशतःअनुदानित शाळांतील शिक्षकांना समाविष्ट करण्याची घोषणा झाल्याने लाखो शिक्षकांना याचा फायदा होईल.
ही समिती कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी दूर करून लवकरात लवकर योजना राबवण्यासाठी काम करणार आहे.

Must Read

I Got कर्मयोगी ईमेल आयडी लॉगिन समस्या सोडवा: सोप्या स्टेप्ससह उपाय! (Link Inside)

लाखो शिक्षकांना याचा फायदा होईल.

आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर म्हणाले, शिक्षक हे राष्ट्र निर्मितीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य असल्यामुळे अंशतः अनुदानित शिक्षकांना समान लाभ मिळेल व त्यांचे मनोबल वाढेल अशी आशा आहे.

विविध शिक्षक संघटनांनी या घोषणेचे स्वागत केले. त्यांच्या म्हणण्यानुसार ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती आणि आताही पूर्ण होत असल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आधीच लाखो लाभार्थ्यांना वैद्यकीय मदत मिळते.

या योजनेच्या अंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत खर्च शासन भरते. आता शिक्षकांसाठी वेगळी तरतूद करण्यात येणार असल्याने, योजनेचा विस्तार होईल.

 

Must Read

TET बंधनकारक,शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार? न्यायालयाचा महत्वपूर्ण निणर्य,शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *