जिओचा धमाका! AI-पॉवर जिओ फ्रेम्स स्मार्ट ग्लासेस लाँच, पाहा काय काय करू शकतात!
मुंबई, 29 ऑगस्ट 2025: रिलायन्स जिओने शुक्रवारी आपल्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) एक जबरदस्त तंत्रज्ञान सादर केलं – जिओ फ्रेम्स! हे AI-पॉवर स्मार्ट ग्लासेस जे तुमच्या रोजच्या आयुष्यात डिजिटल बुद्धिमत्तेचा समावेश करणार आहेत. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी सांगितलं, “जिओ फ्रेम्स हे हँड्स-फ्री AI-पॉवर साथीदार आहे, जे भारतातल्या लोकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन आणि मनोरंजना साठी खास बनवलं आहे.”
जिओ फ्रेम्स: तुमच्या हातात नसलेली तंत्रज्ञानाची जादू!
हे स्मार्ट ग्लासेस सुरुवातीपासूनच अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करतात आणि जिओच्या मल्टिलिंग्वल AI व्हॉइस असिस्टंटसह येतात. आकाश अंबानी म्हणाले, “जिओ फ्रेम्ससह तुम्ही तुमचं जग आधी कधीही न पाहिल्यासारखं कॅप्चर करू शकता. HD फोटो काढा, व्हिडिओ रेकॉर्ड करा किंवा थेट लाइव्ह जा… प्रत्येक आठवण जिओ AI क्लाउडवर लगेच साठवली जाईल.”
HD फोटो आणि लाइव्ह स्ट्रीमिंग: तुमची आठवण आता क्लाउडवर!
या ग्लासेसमुळे तुम्ही फोन कॉल्स करू शकता, मीटिंग्ज अटेंड करू शकता, म्युझिक किंवा पॉडकास्ट ऐकू शकता आणि अगदी स्वयंपाक करताना किंवा प्रवासात स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन मिळवू शकता. यात बिल्ट-इन ओपन-इअर स्पीकर्स आहेत, ज्यामुळे तुम्हाला बाहेरच्या आवाजापासूनही सावध राहता येतं.
आकाश अंबानींचा मोठा दावा: AI तुमच्या डोळ्यांसमोर!
कंपनीने सांगितलं की, हे फ्रेम्स पुस्तकांचा सारांश देऊ शकतात, संकल्पना समजावून सांगू शकतात आणि प्रवासात लँडमार्क्सबद्दल तात्काळ माहिती देऊ शकतात. आकाश अंबानी यांनी शेअरहोल्डर्सना सांगितलं, “बुद्धिमत्ता आता फक्त तुमच्या खिशात राहणार नाही, ती तुमच्या डोळ्यांसमोर असेल!”
ज्यांना जिओ फ्रेम्स खरेदी करायचे असतील त्यांनी, ते https://www.jio.com/jioframes वर रजिस्टर करू शकतात.
त्यांनी AI ला “या युगाची कामधेनू, असं वर्णन केलं. रिलायन्स आपल्या टेलिकॉम, रिटेल, ऊर्जा आणि मनोरंजन क्षेत्रात AI चा वापर करत आहे, असंही ते म्हणाले.
READ ALSO
READ ALSO
मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, भारत AI, स्वच्छ ऊर्जा आणि जीनोमिक्समध्ये आघाडीवर आहे आणि रिलायन्स स्वतःला एक डीप-टेक कंपनी म्हणून नव्याने घडवत आहे. पुढील आठवड्यात जिओच्या 10व्या वर्षात पदार्पण करताना, कंपनीने 50 कोटींहून अधिक ग्राहक मिळवले असून, भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून स्थान मिळवलं आहे.
पुढील आठवड्यात जिओच्या 10व्या वर्षात पदार्पण करताना, कंपनीने 50 कोटींहून अधिक ग्राहक मिळवले असून, भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून स्थान मिळवलं आहे. रिलायन्सने FY25 मध्ये 10.71 लाख कोटी रुपयांचा एकत्रित महसूल आणि 81,309 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.
जिओ फ्रेम्सच्या किंमती आणि उपलब्धतेबाबत अद्याप माहिती जाहीर झालेली नाही, पण हे उत्पादन AI-आधारित, भारत-केंद्रित कनेक्टेड तंत्रज्ञानाच्या इकोसिस्टमचा भाग आहे.