धर्माबाद तालुक्यात भीषण पूर: मंगनाळी गाव पाण्याखाली, रेल्वे लाईन बुडाली, लोकांचे जीव धोक्यात
धर्माबाद, नांदेड (२८ ऑगस्ट २०२५): नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात भीषण पूर. तालुक्यातील मंगनाळी गावात पूराने थैमान घातलंय. निजामसागर धरणातून काल, २७ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं. यामुळे मांजरा नदीला पूर आला आणि पाणी गोदावरी नदीत मिसळलं. परिणामी, मंगनाळी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. गावकऱ्यांचं आयुष्य विस्कळीत झालंय, आणि लोक जीव मुठीत धरून बसलेत. तालुक्यातील रेल्वे लाईनही पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झालीय. प्रशासनाने अजूनही मदतकार्य सुरू केलं नाही. परिस्थिती अजूनही भीषण आहे.
पुरामुळे तालुक्यामध्ये भरपूर नुकसान झालेला आहे.
- निजामसागर धरणातून पाण्याचा विसर्ग: २७ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता धरणातून १,६३,४२६ क्युसेक पाणी सोडण्यात आलं, ज्यामुळे मांजरा आणि गोदावरी नदीला पूर आला.
- मंगनाळी गावाची दयनीय अवस्था: धर्माबाद तालुक्यातील मंगनाळी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. घरे, शेती, जनावरं उद्ध्वस्त झाली असून, गावकऱ्यांचे जीव धोक्यात आहेत.
- रेल्वे लाईनवर परिणाम: पूरामुळे तालुक्यातील रेल्वे लाईन पाण्याखाली गेली, ज्यामुळे वाहतूक ठप्प झालीय.
- प्रशासनाचे प्रयत्न: तहसील कार्यालय परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आणि लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे.
- सतर्कतेचा इशारा: नागरिकांना नदीपात्रात जाणं टाळण्यास, जनावरं-सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्यास सांगितलंय.
धर्माबाद तालुक्यात भीषण पूरामुळे काय घडलं?
निजामसागर धरण तेलंगणातलं असलं, तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यावर होतोय. धरणातून १,६३,४२६ क्युसेक पाणी सोडण्यासाठी १६ पूरद्वार उघडण्यात आली. मांजरा आणि गोदावरी नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली. तहसील कार्यालयाने कालच इशारा दिला होता की, नदीकाठच्या गावांना धोका आहे. लोकांना नदी पूर क्षेत्रात न जाण्याचं, जनावरं आणि सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं सांगण्यात आलं होतं. पण पाण्याचा वेग इतका भयानक होता, की मंगनाळी ग्रामस्थांना खबरदारी घेण्यासाठी वेळच मिळाला नाही.
मंगनाळीत हाहाकार.
मंगनाळी गावातली चित्र पाहून हृदय पिळवटून निघतं. संपूर्ण गाव पाण्याखाली आहे. घरं, शेतं, रस्ते सगळं वाहून जायच्या मार्गावर आहे. एका गावकऱ्याने सांगितलं, “आमचं सगळं उद्ध्वस्त झालं. घरात पाणी शिरलं, पिकं गेली, जनावरं वाहून जायच्या परिस्थितीत आहेत. कुठे जायचं, काय करायचं, काहीच सुचत नाही.” अनेक कुटुंबं घरांच्या छतांवर अडकली आहेत, प्रशासन कुठे आहे. आम्हाला कुठलीच मदत मिळत नाही आहे. पण पाण्याचा जोर आणि सततचा पाऊस यामुळे गावातील लोक अक्षरशः हातबल झाले आहेत. बचावकार्याला अडचणी येताहेत. गावातली शाळा, सार्वजनिक इमारती यांनाही धोका आहे. जनावरांचा मोठा नुकसान झालाय, आणि गावकऱ्यांचं भविष्य अंधारात आहे.
मंगनाळी गावात हाहाकार: गाव झालं जलमय.
संपूर्ण गावाला चहू कडून पाण्याने वेडा घातलय.
धर्माबाद तालुक्यातील मंगनाळी गाव, गोदावरी नदीच्या मिळत असलेला ओढा ओवर फ्लो झाल्यामुळे त्या लाटेचा सर्वाधिक बळी ठरले. गावातील पूर्ण भाग पाण्याखाली बुडाला असून, घरं, शेतं आणि रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. स्थानिक रहिवाश्यांच्या मते, पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, काही क्षणांतच गाव बुडाले. “आमचे घर, पिके, जनावरे सगळे पाण्यात वाहून गेले. जीव मुठीत धरून बसलो आहोत,” असे एका गावकऱ्याने सांगितले. गावातील अनेक कुटुंबे मदतकार्याची वाट पाहत आहेत. प्राण्यांचा देखील प्रचंड नाश झाला असून, शाळा आणि सार्वजनिक इमारतींना धोका निर्माण झाला आहे.
रेल्वे लाईनवर परिणाम
धर्माबाद तालुक्यातली रेल्वे लाईनही या पुराने वेठीला धरलीय. मांजरा नदीचं पाणी ट्रॅकवर शिरलंय, आणि रेल्वे सेवा बंद पडलीय. नांदेड-हैदराबाद मार्गावर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. तरी पूराचा जोर कमी होईपर्यंत वाहतूक सुरळीत होणं कठीण दिसतंय.
प्रशासन काय करतंय?
जिल्हा प्रशासन आणि तहसील कार्यालयाने तात्काळ पावलं उचलली पाहिजे. एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकं गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात यावे. तहसीलदारांनी लोकांना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. “नदीपात्रात जाऊ नका, प्रशासनाच्या सूचना पाळा, आणि अफवांवर विश्वास ठेवू नका,” असं त्यांनी सांगितलं. पावसाचा जोर पाहता, पूराची तीव्रता आणखी वाढण्याची भीती आहे.
पुढे काय?
निजामसागर धरणातून पाणी सोडणं आवश्यक असलं, तरी यामुळे नांदेडसारख्या भागात पूर येण्याचा धोका नेहमीच असतो. गेल्या वर्षीही अशाच घटना घडल्या होत्या. मंगनाळी आणि इतर गावकऱ्यांना तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे, पण दीर्घकालीन उपाययोजनांचीही गरज आहे. धरण व्यवस्थापन, पूर नियंत्रण आणि आपत्ती तयारी यावर पुन्हा विचार करावा लागेल.
गावकऱ्यांना आवाहन
मंगनाळी आणि इतर पूरस्थिती असलेल्या गावांना व नदीकाठच्या गावांमधील लोकांनी सतर्क राहावं. नदीपात्रात जाणं टाळा, जनावरं आणि सामान सुरक्षित ठिकाणी हलवा, आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. कोणतीही अडचण असल्यास तहसील कार्यालय किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवू नका, आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.
हा पूर एक आपत्ती आहे, पण एकजुटीने आणि प्रशासनाच्या मदतीने आपण यावर मात करू शकतो. मंगनाळीच्या गावकऱ्यांना धैर्य आणि आधाराची गरज आहे. प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन त्यांना या संकटातून बाहेर काढलं पाहिजे.
READ ALSO