शिक्षकांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी वाढीव टप्प्यासह वेतन मिळणार, आमदार म्हात्रे आणि देशपांडेंच्या पाठपुराव्याला मोठे यश
मुंबई: राज्यातील हजारो अंशता अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षकांसाठी खुशखबर बातमी आहे. आणि त्यांच्या साठी आजचा दिवस आशेचा किरण घेऊन आला आहे. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानासह वेतनाचा ₹268 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ही बातमी दिनांक शिक्षकांसाठी खुशखबर बातमी आहे. व याबाबतचा शासन निर्णय (जीआर) आज, सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आला, ज्यामुळे शिक्षकांची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे.
मंत्रालयात दिवसभर तळ ठोकून मिळवले यश
मागील आठवड्यात आमदार म्हात्रे आणि देशपांडे यांनी वित्त विभागाकडून नियमित निधी ₹168 कोटी आणि वाढीव टप्प्यासाठी ₹100 कोटी असा एकूण ₹268 कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता. मात्र, या निधी वितरणाचा जीआर शिक्षण विभागाकडून निघणे बाकी होते. या कामाला गती देण्यासाठी दोन्ही आमदारांनी आज सकाळपासूनच मंत्रालयात धाव घेतली.
त्यांनी सर्वप्रथम शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल यांची भेट घेऊन आजच जीआर काढण्याची आग्रही मागणी केली. सचिव देवोल यांनी कक्ष अधिकारी स्मिता देसाई यांना बोलावून याबाबत सूचना दिल्या. तांत्रिक बाबींमुळे (BDS प्रणालीवर अपलोड करण्यापूर्वी वित्त विभागाची पुन्हा परवानगी) थोडा विलंब अपेक्षित होता, मात्र “आजच्या आज कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांनाही खुशखबर बातमी द्या त्यांचं हे काम पूर्ण करा,” अशा स्पष्ट सूचना सचिव देवोल यांनी दिल्या.
यानंतर, आमदार देशपांडे यांनी उपसचिव समीर सावंत यांची भेट घेतली. सावंत यांनीही तातडीने फाईलवर टिप्पणी देऊन ती वित्त विभागाकडे पाठवली. देसाई मॅडम यांनी धावपळ करून वित्त विभागाची अंतिम परवानगी आणली आणि संपूर्ण निधी BDS प्रणालीवर वितरणासाठी उपलब्ध करून दिला. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार म्हात्रे आणि देशपांडे यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अक्षरशः टेबल-टू-टेबल पाठपुरावा केला आणि जीआर हाती आल्यावरच मंत्रालय सोडले. या कामासाठी आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्यासह इतर आमदारांनीही सचिवांना फोन करून पाठिंबा दिला.
राज्यातील शिक्षकांना दिवाळी पूर्वी वेतन मिळावे व शिक्षकांना वाढीव टप्पावाढ अनुदान मिळावे याकरिता मागील आठवडाभर कोकण विभाग आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर, व माजी आमदार श्रीकांत देशपांडे साहेब प्रयत्नशील होते या प्रयत्नांना अखेर यश आले.#BJPVikasitBharat #BJP4Maharashtra #BJP pic.twitter.com/dGeDLZq5Jc
— Dnyaneshwar Mhatre (Modi Ka Parivar) (@MLC_DBMhatre) October 13, 2025
हे तर शिक्षकांसाठी खुशखबर बातमी शिक्षकांच्या भावनांचा कल्लोळ: “हे आमचे खरे देवदूत”
गेली २०-२५ वर्षे विनावेतन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी हा निर्णय म्हणजे मोठा दिलासा आहे. अनेक शिक्षकांच्या नोकरीचा कार्यकाळ संपत आला, तरीही ते वेतनाच्या प्रतीक्षेत नोकरीचा कार्यकाळ संपत आला, तरीही ते वेतनाच्या प्रतीक्षेत होते. या निर्णयामुळे त्यांच्या संघर्षाला फळ मिळाले आहे.
परभणी येथील एका विनाअनुदानित शिक्षकाने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि श्रीकांत देशपांडे साहेब हे आमच्यासाठी देवदूत ठरले आहेत. त्यांनी स्वतःचे सुख बाजूला ठेवून आमच्या हक्कासाठी जो लढा दिला, त्याला आमचा सलाम आहे. त्यांच्यामुळे आज हजारो शिक्षकांच्या घरात दिवाळी साजरी होणार आहे.”
राज्यातील शिक्षकांची दिवाळी होणार कोड टप्पा वाढ अनुदानासह दिवाळीपूर्वी होणार वेतन
— Dnyaneshwar Mhatre (Modi Ka Parivar) (@MLC_DBMhatre) October 13, 2025
आमदार
ज्ञानेश्वर म्हात्रे सर #BJP4Maharashtra #bjpvikasitbharat #maharashtra #भाजपा #BJP #DevendraFadnavis pic.twitter.com/VspIkkJick
या संपूर्ण धावपळीत आमदार महोदयांसोबत संघटनेचे प्रा. संतोष वाघ, श्री. पुंडलिकराव राहाटे आणि श्री. बाबासाहेब वाघमारे हे देखील मंत्रालयात उपस्थित होते. दिलेल्या शब्दाची पूर्तता करत या लोकप्रतिनिधींनी शिक्षकांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. आता हा निधी शिक्षण संचालकांमार्फत लवकरच वितरित केला जाईल आणि दिवाळी पूर्वी सर्व शिक्षकांच्या खात्यात वाढीव टप्प्यासह वेतन जमा होईल.
Read Also:
- TET संदर्भात नवीन अपडेट | शेकडो शिक्षकांचा पगार अडकणार. वेतन अधीक्षकांची शाळांना महत्त्वाचे आदेश
- नियुक्तीचे दस्तावेज शालार्थ प्रणाली मध्ये अपलोड करा. नाहीतर पगार थांबेल |
- मोठी बातमी २०%,४०%६०% आणि आता ८०% मोठी बातमी २०%,४०%६०% आणि आता ८०% विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!
- स्मार्ट मीटर की स्मार्ट फसवणूक? वाढीव बिलांमुळे ग्राहक संतापले!