“श्रावण सोमवार व्रत: पूजा विधी, कथा आणि महत्त्व 2025”

श्रावण सोमवार व्रत: पूजा विधी, कथा आणि महत्त्व 2025

श्रावण सोमवार शास्त्रोक्त पूजा विधि आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे काय आहे याबद्दल सविस्तर माहिती.


श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो विशेषता,
श्रावण महिन्यातील सोमवार ज्याला आपण श्रावण सोमवार असे म्हणतो.
श्रावण सोमवार हे भगवान महादेव यांच्याशी थेट संबंध आहे. पारंपरिक कथा नुसार श्रावण महिन्यात हे व्रत भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्ती करण्यासाठी श्रावण मास व्रत केले जातात. पौराणिक कथा नुसार देवी पार्वतीमाता ने भगवान शिव शंकरांना प्रसन्न करण्यासाठी व त्यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण मास व्रत हे केले होते.

श्रावण सोमवार म्हणजे काय ?

हिंद पंचांगानुसार, रावण हा पाचवा महिना आहे जो साधारणपणे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येतो. श्रावण महिना हा भगवान शंकरांचां प्रिय मास (महिना) आहे. या महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केल्याने विशेष फल-प्राप्ती होते. हा महिना आध्यात्मिक व हिंदू धर्माच्या दृष्टीने सगळ्यात पवित्र महिना मानला जातो.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो. कारण सोमवार हा भगवान महादेवांचा आवडता वार आहे. या काळात फक्त श्रावण सोमवारी उपवास करतात आणि शिवलिंगावर जलाभिषेक दूध, दही, मध, साखर,आणि तूप यांचा अभिषेक करतात या पूजेमुळे भक्तांना मानसिक शांती, समृद्धी आणि इच्छापूर्ती होते अशी श्रद्धा आहे.

श्रावण सोमवारचे धार्मिक महत्त्व.


देव आणि दानव मध्ये अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन झालं. या मंथनातून “14 रत्न” सोबतच हलाहल नावाचं विष बाहेर पडलं. हे विष इतकं भयंकर होतं की त्याने संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकत होता.
समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा हे विष बाहेर आले, तेव्हा भगवान शिव यांनी त्या विषाने जगाचा विनाश होईल म्हणून तेव्हा स्वतः भगवान शिव यांनी ते प्राशन करून विश्वाचे रक्षण केले. निघालेले विष भगवान शंकरांनी प्यायल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला,
या यामुळे त्यांना नीलकंठ हे नाव पडलं.
या घटनेनुसार, भगवान शंकरांनी जगाला वाचवण्या साठी स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही.

श्रावण सोमवार उपवासाचे प्रकार.


श्रावण सोमवार उपवासाचे अनेक प्रकार आहेत जे भक्त त्यांच्या श्रद्धेनुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार पाळतात.

  1. निर्जल उपवास: यामध्ये भक्त संपूर्ण दिवस पाणी,अन्न ग्रहण करत नाहीत हा सर्वात कठीण उपवास. आहे आणि तो केवळ शारीरिक दृष्ट्या सक्षम व्यक्तीनेच करावा.
  2. पळ – हार उपवास: यामध्ये भक्त फळे दूध दही यासारखे पदार्थ सेवन करतात.
  3. सामान्य उपवास: यामध्ये भक्तगण दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी सात्विक भोजन ग्रहण करतात.
  4. सोळा सोमवार उपवास: यामध्ये काही भक्त जण सोळा सोमवार उपास करतात. ज्यामध्ये श्रावण सोमवारचा समावेश असतो. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून सोळा सोमवार पर्यंत उपवास करण्याची पद्धत आहे.
  5. शिवमूठ: श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला विशिष्ट धान्यांचे मूठ अर्पण केली जाते. यामध्ये गहू, तांदूळ, मूग, आणि तीळ यांचा समावेश आहे
  6. प्रदोष व्रत: श्रावण मध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रदोष व्रत के केले जाते.

उपवासाचे नियम

उपवासाच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत.
फक्त फळे दुग्धजन्य पदार्थ आणि उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात.
दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिवपुराण किंवा इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
संध्याकाळी भगवान शंकरांची आरती करून उपवास सोडावा.

 

शिवमुठ म्हणजे काय ?


श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराला विशिष्ट धन्यांची मुठ अर्पण केली जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मुग, आणि चौथ्या सोमवारी जव अर्पण केले जातात.

 

श्रावणी सोमवारचे पूजा विधि.

श्रावणी सोमवारची पूजा विधि खूप प्रभावी आहे. खालील प्रकारे पूजा विधी करावी.

  1. सकाळी लवकर उठणे: सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  2. शिवलिंगाचे पूजा: शिवलिंगाला पाण्याने स्वच्छ धुवावे आणि त्यावर गंगाजल शिंपडावे.
  3. अभिषेक: शिवलिंगावर दूध, दही, मध, साखर, तूप आणि गंगाजल यांचा अभिषेक करावा याला पंचामृत अभिषेक म्हणतात.
  4. बिल्वपत्र-अर्पण: भगवान महादेवांना बेलाचे पान अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे शिवलिंगावर बेल चढवावे. किंवा बेल अर्पण करावे.
  5. धूप दीप: धूप आणि दीप प्रज्वलित करून शिवलिंगाच्या आरती करावी.
  6. मंत्र जप: “ओम नमः शिवाय” हा मंत्र १०८ वेळा जपावा. याशिवाय महामृत्युंजय मंत्र किंवा शिवतांडव स्त्रोत यांचे पठन करावे. ज्यांना आर्थिक समस्या आहे, त्यांनी दारिद्र्य दहन स्त्रोत म्हणावे.
  7. प्रसाद: पूजेनंतर खडीसाखर फळे किंवा सात्विक प्रसाद अर्पण करावा आणि भक्तामध्ये ते वाटण करावे.

श्रावण सोमवार पौराणिक कथा महत्त्व.

1. समुद्रमंथन कथा: समुद्रमंथनातून बाहेर आलेले विष प्राशन करून भगवान शंकरांनी सृष्टीचे रक्षण केले. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जलाभिषेकाचे विशेष महत्त्व आहे.

2. पार्वती मातेची तपश्चर्या: माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर तपश्चर्या केली.
यामुळे अविवाहित मुली या दिवशी उपवास करतात.

3. मार्कंडेय ऋषींची कथा: मार्कंडेय ऋषींनी महामृत्युंजय मंत्राच्या जपाने मृत्यूवर विजय मिळवला होता. या कथेमुळे श्रावण सोमवारला हा मंत्र जपण्याचे महत्त्व आहे.

भारतातील श्रावण सोमवारचे महत्व.

 


श्रावण समोर हा केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.


1. महाराष्ट्र: महाराष्ट्रात श्रावण सोमवारला विशेष महत्त्व आहे . सोमवारला मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते. विशेषतः ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केले जातात.


2. उत्तर भारत: उत्तर भारतात कावड यात्रा आयोजित केली जाते. ज्यामध्ये भक्त गंगेचे पाणी घेऊन शिव मंदिरामध्ये जल अभिषेक करतात करतात.


3. दक्षिण भारत: दक्षिण भारतात श्रावण महिना शिव मंदिरामध्ये विशेष पूजा आणि भजन कीर्तन आयोजित केले जातात.

श्रावण सोमवार उपवास करण्याचे फायदे.


1. अध्यात्मिक लाभ: उपवास आणि पूजा यामुळे मन शांत होते आणि आध्यात्मिक उन्नती होते.


2. शारीरिक लाभ: उपवासामुळे शरीर डिटॉक्स होते. आणि पचन संस्था मजबूत होते. व रोग प्रतिकारशक्ती पण वाढते. हे सायंटिफिकली प्रूव झालेला आहे.


3. मानसिक शांती: भगवान महादेवांच्या भक्तीमुळे तणाव कमीत कमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.


4. इच्छापूर्ती: असे मानले जाते की श्रावण सोमवार उपासामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

भारतातील श्रावण सोमवारचे महत्व.



श्रावण समोर हा केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.


1. महाराष्ट्र: महाराष्ट्रात श्रावण सोमवारला विशेष महत्त्व आहे . सोमवारला मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते. विशेषतः ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केले जातात.


2. उत्तर भारत: उत्तर भारतात कावड यात्रा आयोजित केली जाते. ज्यामध्ये भक्त गंगेचे पाणी घेऊन शिव मंदिरामध्ये जल अभिषेक करतात करतात.


3. दक्षिण भारत: दक्षिण भारतात श्रावण महिना शिव मंदिरामध्ये विशेष पूजा आणि भजन कीर्तन आयोजित केले जातात.

 

श्रावण सोमवार उपवास करण्याचे फायदे


1. अध्यात्मिक लाभ: उपवास आणि पूजा यामुळे मन शांत होते आणि आध्यात्मिक उन्नती होते.


2. शारीरिक लाभ: उपवासामुळे शरीर डिटॉक्स होते. आणि पचन संस्था मजबूत होते. व रोग प्रतिकारशक्ती पण वाढते. हे सायंटिफिकली प्रूव झालेला आहे.


3. मानसिक शांती: भगवान महादेवांच्या भक्तीमुळे तणाव कमीत कमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.


4. इच्छापूर्ती: असे मानले जाते की श्रावण सोमवार उपासामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात
.

 

श्रावण सोमवार व्रत मुहूर्त.

शिव पूजेसाठी उत्तम मुहूर्त पंचांगानुसार सोमवारी अभिजीत मुहूर्त 12:00 PM पासून 12:55 PM, रवी योग 05:40 AM पासून 05:35 PM पर्यंत असेल. अशात राहुकाल व भद्रा रहीत मुहूर्त 09:05 AM पासून 10:56 AM पर्यंत असेल.

One thought on ““श्रावण सोमवार व्रत: पूजा विधी, कथा आणि महत्त्व 2025”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *