कर्नाटक सरकारला छत्रपती शिवाजी महाराज बद्दल इतका द्वेश का?

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान? बेंगलोर मेट्रो स्टेशनचं नाव 'सेंट मेरी' करणार, मागे काय इतिहास आहे तेकर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान? बेंगलोर मेट्रो स्टेशनचं नाव 'सेंट मेरी' करणार, मागे काय इतिहास आहे ते वाचून धक्का बसेलवाचून धक्का बसेल
Spread the love

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान? बेंगलोर मेट्रो स्टेशनचं नाव ‘सेंट मेरी’ करणार, यामागे काय कारण आहे ते वाचून धक्का बसेल!

कर्नाटकातल्या बेंगलोर मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर असं नाव होतं, ते बदलून आता स्टेशनचं सेंट मेरी असं नामांतर होणार आहे. तशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या करतायत. साहजिकच, यावर महाराष्ट्रात संताप होतोय! नामांतरामुळे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतोय. या अवमानाविषयी तुमची जीभ गप्प का, असा सवाल भाजपने काँग्रेसला केलाय. कारण कर्नाटकात काँग्रेसच सरकार आहे. याआधीही २०२० मध्ये येडी युरोप्पा सरकारने इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांना वगळण्याचा निर्णय घेतला.

कर्नाटकला छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वावडं आहे?

साधा प्रश्न पडतो – आधी महाराजांवरचे धडे वगळणं, आता स्टेशनवरून महाराजांचं नाव हटवून सेंट मेरी असं नामांतर करणं… कशामुळे? कांतारा फेम अभिनेता ऋषभ शेट्टी हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार म्हटल्यावर त्याच्या फॅन्सने सुद्धा त्याला ट्रोल केलं होतं. पण कर्नाटकी लोकांमध्ये महाराजांबद्दल इतका मत्सर का?

त्याचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेली कर्नाटकची मोहीम! छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी त्यांनी एक दीर्घ मोहीम आखली होती. ती मोहीम होती – दक्षिण दिग्विजय मोहीम!

कर्नाटकात बंगळूर इथे शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांची जहागीर होती. महाराजांचं काही काळ बालपणही बंगळूरमध्ये गेलं होतं. कर्नाटकची जहागीर त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे सांभाळत होते. उत्तरेतल्या मुगलांनी आक्रमण केलं तर संरक्षणासाठी स्वराज्याची पाळेमुळे दक्षिणेत खोलवर पसरलेली असावी, असं महाराजांना वाटत होतं. आणखी काही कारणं म्हणजे कर्नाटकात तेव्हा आदिलशहाची सत्ता होती. त्याच्या पठाण सरदारांचा तिथल्या रयतेला त्रास होत होता. महाराजांनी आदिलशहाचा बंदोबस्त करायचं ठरवलं. शिवाय व्यंकोजी राजेंना देखील समजावून स्वराज्यात सामील करावं, हा एक कर्नाटक मोहिमेचा दुसरा हेतू होता.

तेवढ्यासाठी त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली. या मोहिमेसाठी अफाट खर्च होणार होता, याची राजांना कल्पना होतीच. पण त्याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मोहिमेला लागणारा कालावधी – किमान वर्षभरासाठी! महाराजांना स्वराज्य सोडून दक्षिणेकडे जावं लागणार होतं. या मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता पाळून बाहेर चुकीची माहिती पसरवायला त्यांनी सुरुवात केली. ती म्हणजे – महाराज तंजावर इथे आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटण्यासाठी निघालेत आणि या भेटीस जहागिरीतील अर्धा हिस्सा आपल्याला मिळावा, अशी मागणी त्यांना करणार आहेत. मोहिमेचा एकच उद्देश आहे, असं सांगण्यात आलं.

पण महाराजांनी या मोहिमेसाठी आपल्यासोबत सेनापती हंबीरराव मोहिते, २० हज घोडदळ, ४० हज पायदळ घेतलं. भरपूर खजिना, कर्नाटकचे माहिती लोक, अनेक शूर लढवई सरदार – असं सगळं घेऊन ते दक्षिणेची वाट चालू लागले. गोवळ गोंड्याचा कुतुबशाहा महाराजांच्या पाठीशी उभा राहिला. त्याची गाठ घेऊन महाराज आंध्रप्रदेशमधून दक्षिणेत तमिळनाडूमध्ये मद्रासपर्यंत पोहोचले. मोहिमेच्या सुरुवातीला महाराजांनी रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव इथल्या मोहनी बाबांचं दर्शन घेतलं. त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सैन्याचं त्यांनी दोन भाग केले. एक भाग घेऊन महाराज स्वतः भाग्यनगरकडे रवाणा झाले आणि दुसरा भाग हंबीरराव मोहित्यांकडे त्यांनी सोपवला.

हंबीररावांनी आदिलशाही भागातला भला मोठा प्रदेश लढाई करून जिंकला आणि तिथून खंडणी गोळा करून ते कुतुबशाही मुलखात शिरले. ते पुढे महाराजांना भाग्यनगरमध्ये जाऊन मिळाले. भाग्यनगरात महाराजांचं कुतुबशाहीच्या पातशहांनी जोरदार जंगी स्वागत केलं. पातशहाने महाराजांसोबत तह केला. त्या तहानुसार कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा खर्च हा कुतुबशाही उचलणार, असं ठरलं. त्याच सोबत गोवाळ कोंड्याचा सेनापती मिर्झा अहमद अमीनच्या नेतृत्वाखालील पुढील मोहिमेस उपयुक्त असा सर्वात आधुनिक तोपखाना, ४००० पायदळ आणि १००० घोडदळ शिवाजी महाराजांना दिलं गेलं.

इथून पुढे कर्नाटक मोहिमेतील महत्त्वाचा प्रांत काबीज करण्याची खरी सुरुवात झाली. जिंकलेल्या प्रदेशाची त्यांनी व्यवस्था लावली, किल्ल्यांची डागडुजी केली, प्रशासन केलं. आपले सरदार किल्लेदार या भागात नेमले. तिथल्या रयतेला त्रास न देण्याचे आदेश! यामुळे दक्षिणेतल्या लोकांचा मराठ्यांवर विश्वास बसला. बऱ्याच काळानंतर दक्षिणेत स्थैर्य आणि शांतता, सुव्यवस्था नांदत होती. याला कारण ठरली मराठ्यांची दक्षिण दिग्विजय मोहीम!

या अंतर्गत महाराजांनी जिंजी, वेल्लोर यांसारखे महत्त्वाचे किल्ले सर केले. मग ते कर्नाटकाकडे वळले. व्यंकोजी राजेंना स्वराज्यात सामील करावं, हा कर्नाटक मोहिमेचा हेतू होता. व्यंकोजी राजेंना समजावून सांगणारी पत्रे धाडली गेली, पण ते ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला गेला. शेवटी व्यंकोजी राजे नमले. त्यांनी शिवाजी महाराजांशी तह केला.

महाराजांची ही दक्षिण मोहीम जवळपास दीड वर्ष चालली. पुढे दक्षिण आरकाट, अरणी, हॉस्कोट, शिरे, बाळापूर – पश्चिम दिशेला जोडणारी स्थळे काबीज करत महाराजांनी नोव्हेंबर १६७७ मध्ये कर्नाटक मोहिमेची सांगता केली आणि महाराजांनी परतीचा प्रवास सुरू केला. कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धांचलम तसेच शहाजी राजांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश – बाळापूर, बंगळूर, शिरे, होस्कोड जिंकून घेतला. अरणीला वेढ घालून अरणी जिंकली. त्यासोबतच चिक बाळापूर, दोड बाळापूर, देवरायनदुर्ग, तुमकूर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हमपी, कनकगिरी, कोपळ, लक्ष्मेश्वर, गदक – हा भागही जिंकून घेतला.

दक्षिण मोहिमेत जवळपास १०० किल्ले महाराजांच्या ताब्यात आले होते. मार्गात असणारी छोटी मोठी ठाणे ही ताब्यात घेतली जात होती आणि १६७८ मध्ये ते रायगडावर परत आले. या संपूर्ण मोहिमेत महाराजांनी स्वराज्याच्या दुपटीहून जास्त मुलक मिळवला. ज्याला पुढे जिंजीच राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तसेच या मोहिमेत महाराजांनी मोगल, सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, कुतुबशाही, आदिलशाही – सर्वांचा चोक बंदोबस्त केला. यातून महाराजांची दूरदृष्टी अनुभवास आली!

छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय मोहिम

जेव्हा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने स्वराज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली, हल्ला केला, तेव्हा राजाराम महाराजांना रायगड सोडावा लागला. तेव्हा त्यांनी जिंजीमध्ये वास्तव्य केलं होतं आणि तेव्हा जिंजी ही स्वराज्याची राजधानी म्हणून नावारूपास आली होती. हाच जिंजी किल्ला महाराजांनी कर्नाटक मोहिमेत जिंकला होता. औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणातून स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडलं – याचं निर्विवाद श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेला नक्कीच जातं!

यातला एक प्रसंग घडला – धारवाडजवळचं बेलवडी यादवाड इथे यसाजी प्रभू देसाई यांनी कोणत्याही लढाईशिवाय मांडलिकत्व स्वीकारलं. पण काही कारणाने यादवाडमध्ये मराठ्यांच्या तिथल्या सैन्याशी युद्ध झालं. यसाजी प्रभू देसाई यांच्या निधनानंतर राणी मल्लाबाई यांनी आपल्या पराक्रमाने २७ दिवस तिथला किल्ला लढवला, पण त्यांचा पराभव झाला. मल्लाबाई देसाई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर आल्या आणि त्यांनी आपलं गाराणं महाराजांच्या समोर मांडलं.

महाराजांचं स्त्री-दाक्षिण्य

पतीच्या निधनानंतर मोठ्या धीराने मराठी सैन्याशी दोन हात करणाऱ्या राणी मल्लाबाईला तिचं राज्य मुलांच्या दूध-भातासाठी म्हणून महाराजांनी परत दिलं. त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मल्लाबाईला आईच्या जागी मानून सावित्री म्हणून गौरवलं! यातून महाराजांचं स्त्री-दाक्षिण्य लक्षात येतं. शिवाजी महाराजांनी दिलेल्या न्यायाची आठवण म्हणून मल्लाबाईने शिवरायांच्या हयातीतलं पहिलं शिल्प बनवलं आणि महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास कर्नाटकाच्या भूमीत कोरला गेला.

महाराष्ट्र द्वेषाचा राजकारण

पण आजवर कर्नाटकात जेवढी सरकारं आली, त्यांनी महाराष्ट्राचा द्वेष करणारं राजकारण खेळलं. त्याचमुळे कर्नाटकी लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राग किंवा नकारात्मक भावना आहे. ज्यामुळे कर्नाटकी जनतेचा असा समज आहे की महाराजांच्या वारसदारांनी सतराव्या आणि १८व्या शतकात कर्नाटकावर अनेकदा हल्ले केले. ज्यात लूट, मंदिरांचं नुकसान आणि सामान्य लोकांवर अत्याचार झाले. शिवाय त्यांनी शेतकऱ्यांना लुटलं आणि अर्थव्यवस्था उद्वस्त केली, अशी ही टीका केली जाते. कन्नड लोकांना शिवाजी महाराज हे मराठा शासक वाटतात ज्यांनी कर्नाटक लुटलं.

एकूणच मराठा आक्रमणांच्या आठवणींमुळे कर्नाटकी लोकांचा महाराजांवर राग कायम आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा! आणि अशीच माहिती मिळवायची असेल तर आमच्या ताजा टाईम मराठीला फॉलो करायला विसरू नका!

Read Also:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *