Ladki Bahin Yojana Maharashtra:योजनेत घोटाळा: १४ हजार पुरुषांनी घेतला महिलांचा लाभ!

Ladki Bahin Yojana Maharashtra
या योजनेमध्ये 14,000 हून अधिक पुरुषांनी शासनाची फसवणूक केल्याचे समजते
या फसवणुकीमुळे महाराष्ट्र शासनाचा अंदाजे 21 ते 22 कोटी रुपयांचा नुकसान झालंय.
Ladki Bahin Yojana Maharashtra
योजनेमध्ये 14000 पुरुषांनी स्वतःला महिला दाखवून या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना महिना पंधराशे रुपये. शासन या बहिणीच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे ट्रान्सफर करतो. परिणाम स्वरूपी दहा महिन्यांमध्ये २१.४४ कोटी रुपयांचं अंदाजे नुकसान झाल्याचं समोर येते.
21 पासून ते 65 वर्षाच्या वयाच्या महिलांना हा योजनेचा लाभ मिळत होता. या योजनेमुळेच महायुती सरकारला निवडणुकीमध्ये मोठा यश मिळालं होतं. परंतु शासनाच्या वित्त विभागाला आर्थिक बोजा खूप मोठा आहे. त्यामुळे या योजनेचे आलोचना पण होतोय. महिला व बालविकास विभाग यांच्या चौकशीने हे समजलं की 14 हजार 298 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने स्वतःला महिला लाभार्थी दाखवून शासनाची फसवणूक केली. सध्या शासनाने त्यांची लाभ थांबवलेले आहेत. आणि तपास सुरू केले आहे.
सध्या महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेमध्ये 2.41 करोड लाभार्थ्यांना ही योजना प्रदान करण्यासाठी 3700 करोड रुपये खर्च वित्त विभाग करते. वित्त विभागाच्या या रिपोर्टनुसार मागील वर्षात राज्याला ₹१६४० कोटी रुपये Ladaki Bahhin Yojana Maharastra या योजनेसाठी खर्च करावे लागले. ज्यामध्ये लगबग पाच लाख अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यात आली. ज्यांच्यामध्ये चार चाकी वाहन कुटुंबात किंवा परिवारात असणाऱ्या महिला, आणि अधिक उत्पन्न असलेल्या महिला याच्यामध्ये आहेत. हे निकषात न बसणारे महिला अगोदर या योजनेचा लाभ घेत होते. या व्यतिरिक्त ७९७००० असे प्रकरण समोर आलेत की ज्या योजनेचे लाभ घेणाऱ्या व त्या परिवाराशी संबंधित तिसरी महिला आहे. हे अट त्या योजनेच्या निकषात बसत नाही. ladaki bahin yojana maharastra योजनेत
एका परिवारातून दोन पेक्षा जास्त महिला या योजनेमध्ये बसत नाहीत.
परिणाम स्वरूपी 1196 कोटीचा अतिरिक्त बोजा शासनावर पडला.
या प्रकरणातील माहिती समोर आल्याने महिला एवं बाल विकास विभागाने लगेच तपास सुरू केला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या डेटा चे तपासणी दरम्यान २.३६ लाख लाभार्थ्यांच्या रेकॉर्डमध्ये संशयास्पद तपशील आढळले. याच्यामध्ये अधिकांश प्रकरणात पुरुषां द्वारे महिलांच्या ओळखीचा गैरवापर करण्यात आला. अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घोटाळ्यामध्ये सरकारने आता लाभार्थ्यांचे कागदपत्रे पुन्हा तपासण्याचा निर्णय घेतला असून, अपात्र व्यक्तींकडून पैसे वसुलीची प्रक्रिया सुरू होईल अशी शक्यता आहे.
या घोटाळा मुळे विरोधी पक्ष सरकारवर जोरदार टीका करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार हे सरकारचं मोठं अपयश आहे.Ladaki Bahin Yojana Maharastra ही योजना केवळ चुनावी जुमला असल्याचं आणि निवडणूक प्रचारासाठी हा एक दिखावा होता. आणि यासाठी डेटा वेरिफिकेशन ची गंभीरता व कसलीच काळजी घेतली नाही. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे ने ₹४,८०० करोड रुपयांचा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप केले आहे. त्यांनी दोशीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांनी अपात्र लाभार्थ्यांची संख्या वर आश्चर्य व्यक्त करत, त्यावर तोडगा कसे काढावे या विचारात अधिकारी आहेत. ऑनलाईन आवेदन प्रक्रिया यासाठी कारण असल्याचे अधिकारी बोलत आहेत. आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी त्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे. म्हणून त्यांनी आयकर विभागाशी सहयोग करत आहे. व आयकर विभागाची मदत पण घेत आहे. कारण केवळ अडीच लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. धोखाधडी करून जे लोक या योजनेचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहेत, किंवा फायदा घेत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी असे म्हटले की 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांना लाभ सध्या पूर्णपणे थांबवलेला आहे.

निवडणुका दरम्यान August 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली Ladaki Bahin Yojana Maharastra ही योजना पडताळणी नंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ सुरू करेल, पण सरकारला जाणीवपूर्वक या योजनेचा लाभ घेऊन फसवणूक करणाऱ्यांना कठोर कारवाई करेल असे, असे, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी म्हटले. व ही योजना पूर्णपणे महिलांसाठी आहे. जे पुरुष या योजनेमध्ये आवेदन केले होते व लाभ घेतले होते. त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल असे पण ते म्हणाले. आणि पुढे असे होणार नाही याची सरकार पूर्ण काळजी घेईल असे ते म्हणाले.
महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या प्रकरणांमध्ये प्रतिक्रिया देताना असे म्हणाले की, या घोटाळ्याची माहिती मिळताच आम्ही लगेच तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील अपात्र लाभार्थ्यांना त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी कायदेशीर कार्यवाही केले जाईल. तसेच या यंत्रणेत पण सुधारणा करण्यात येईल. या योजनेच्या त्रुटीमुळे पात्र महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेक महिलांच्या म्हणण्यानुसार अपात्र लोकांना लाभ भेटतोय पण आमचे अर्ज प्रलंबित आहेत. जे खूप अन्यायकारक आहे.
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ( मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ) पुढे सुरळीतपणे चालेल की नाही बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. सरकारने आतापर्यंत २.४६ कोटी महिलांना या योजनेत समाविष्ट केले असून. प्रत्येक महिन्याला लगभग ३७०० कोटी रुपये वितरित केले जातात. परंतु अपात्र लाभार्थ्यामुळे सरकारी वित्त विभागावर ताण वाढला आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही योजना लवकरच बंद पडेल अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे सरकारने योजनेचे अवधी वाढून पात्रतेचे अटी व निकष कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणामुळे ५० लाख महिलांना या योजनेतून बाहेर केले आहे.
या प्रकरणाचे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच डिजिटल सत्यापन प्रणाली मजबूत करून भविष्यामध्ये अशा प्रकार टाळण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. Ladki bhinn Yojana Maharashtra ही योजना महिलांचा सक्षमीकरणासाठी बनवलेली आहे. आणि याचा दुरुपयोग होणे ही चिंतेची बाब आहे.
महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये सुरु केलेली Majhi Ladki Bahin Yojana Maharastra ही गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणारी महत्वाकांक्षी योजना आहे. मासिक ₹1,500 या लाभातून दर महिन्याला बरीच महिलांना मदत मिळावी, असाच योजनांचा उद्देश होता.
Ladaki Bahin Yojana Maharastra या योजनेच प्रशासकीय उपाय आणि भविष्यातील धोरण
सरकारने आयटी‑डेटा, CBDT डेटाचा वापर करून योजनांचा अधिक कठोर तपास सुरू केला.
आता Government employees, उच्च उत्पन्न गट, उपयुक्त इतर योजनांचे लाभार्थी यांना पूर्णपणे बाहर करण्यात येत आहे.
पुढील कारवाई करणे, फसवणूक केलेल्यांकडून लाभाची परतफेड आणि कायदेशीर पावले उचलण्याची तयारी आहे .
Ladaki Bahin Yojana Maharastra योजनेचे उद्दिष्ट आणि सध्याची स्थिती
योजना सुरुवातीला महिला सशक्तीकरणासाठी आर्थिक स्वावलंबन देण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आली.
मात्र, काही अपात्र लाभार्थ्यांमुळे या योजनेवर विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला.
सध्याच्या योग्य तपासणीनंतर, शासनाचा उद्देश केवळ योग्य लाभार्थ्यांना निधी पोहोचवणे असा आहे.
श्रावण सोमवार व्रत पूजा विधि आणि महत्व जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.