नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शाळांना सुट्टी | सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज (IMD)

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस 29 ऑगस्ट 2025 रोजी शाळांना सुट्टी, पूराचा धोका कायम
Spread the love

 नांदेड, – 29 ऑगस्ट 2025:नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस व अतिव्रष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे,कारण कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट आणि येल्लो अलर्ट जारी केले असून, सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.   महाराष्ट्रातील मराठवाडा विशेषता नांदेड जिल्हा अगस्ट 2025 मध्ये सततच्या मुसळधार पावसाचा सामना करत आहे. ऑगस्टच्या मते झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन 2200हून अधिक लोकांचे स्थलांतर आणि काही ठिकाणी मृत्यूची नोंद झालेली आहे.  नांदेड शहर आणि आसपासच्या परिसरात परिस्थिती निर्माण झालेली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार, धर्माबाद,मुखेड, बिलोली, देगलूर,नायगाव या ठिकाणी पुरामुळे खूप नुकसान झालेला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस 29 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळांना सुट्टी पुराचा धोका कायम.

सततच्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार 29 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती आणि विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या अधिकृत सूचित म्हटले आहे की नांदेड जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मतदार पावसामुळे आज 29 8 2025 रोजी शुक्रवारी सर्व शाळा सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. सर्व संबंधित विभागाने याची नोंद घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेल्या या निर्देशात सतर्कतेची गरज अधोरेखित केली असून पालक शिक्षक आणि प्रशासनाला सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
आजचा या शाळा बंद मुळे प्राथमिक ते उज्ज माध्यमिक स्तरावरील सरकारी, खाजगी आणि अनुदानित शाळा तसेच अंगणवाड्या आणि प्री स्कूल बंद राहणार आहेत.  

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस मुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.

मराठवाड्याच्या मध्यभागी वसलेला नांदेड हा जिल्हा मान्सूनच्या अतिवृष्टीला बळी पडला आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार या महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात काही भागांत 200 mm पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. ज्यामुळे मुखेड धर्माबाद नायगाव बिलोली देगलूर अशा ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची संबंधित घटनांमध्ये किमान आठ जणांचा मृत्यू झाला, यात बुडून मृत्यू होणे आणि इमारती कोसळण्यासारख्या घटनांचा समावेश आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यात खालच्या भागांमधून 2236 हुन अधिक रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे, कारण गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडली होती. बचाव कार्य राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) जाने पूरग्रस्त गावांमधून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. नांदेड शहर आणि ग्रामीण भागात 30-40 किमी परिसरामध्ये भयंकर पाऊस झाल्यामुळे काही घरांमध्ये पाणी शिरलेला आहे. ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. शाळांची कनेक्टिव्हिटी खंडित झालेली आहे. आणि काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. अपघातांचा धोका लक्षात वाढला आहे. शहरी भागात पाणी साचल्यामुळे गटारी तुटल्या असून कालपासून होत,असलेल्या पावसामुळे आज खबरदारी म्हणून नांदेड जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आले आहेत.

तज्ञांचे म्हणणे आहे की हवामान बदलामुळे मान्सूनच्या पद्धतीत बदल होत असून पश्चिम आणि मान्सून प्रवाहांचा परस्पर संनाद याला कारणीभूत आहे. पुणे वेधशाळेने मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, 31 ऑगस्ट पर्यंत काही ठिकाणी 60 किमी तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे नांदेड मध्ये पूरस्थिती बिकट होऊ शकते जिथे कापूस ऊस आणि सोयाबीनच्या शेतांना आधीच नुकसान झालेला आहे. मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पशुधन मृत्यू आणि घरांचे नुकसान नोंदवले असून, सरकारी नुकसान भरपाई ची मागणी केली आहे. आज लातूर जिल्ह्यातही 29 ऑगस्ट साठी शाळा बंद जाहीर केले आहे. व शेजारील राज्य कर्नाटक आणि तेलंगाना व राज्यस्थानच्या जोधपुर मध्ये पावसामुळे सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. पंजाब सरकारने तर पूर अलर्टमुळे 30 ऑगस्ट पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मान्सूनचा उत्तर आणि पश्चिम भारतावर व्यापक परिणाम झालेला दिसून येतोय.

नांदेडच्या रहिवाशासाठी ही सुट्टी दिलासा देणारी असून प्रत्येक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. शहरी नांदेड मधील पालक बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदमुळे चिंता व्यक्त करत आहेत. अधिकारींनी नद्या किंवा खालच्या भागात प्रवास सुटाण्याचा आणि आपत्कालीन किट तयार ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत व योग्य निर्देश दिले असून यापूर्वी नांदेडमध्ये ढगफुटी सारख्या घटना घडल्या होत्या. राज्यातील संभाव्य संकटासाठी 18 NDRF आणि सहा SDRF पथके तैनात केली आहेत.

READ ALSO :नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. धर्माबाद तालुक्यातील मंगनाळी गावाला पूराचा वेढा.   

READ ALSO 

तुम्हीही घराच्या छतावर सोलर पॅनल लावून कमाई करू शकता. PM Surya Ghar Yojana बद्दल सविस्तर माहिती इथे वाचा आणि आजच अर्ज करा.”

 

👉भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे, तर पुण्यासाठी रेड अलर्ट आहे. याबाबत सविस्तर माहिती [महाराष्ट्र हवामान अंदाज] [महाराष्ट्र हवामान अंदाज] मध्ये वाचा.

👉टप्पा वाढीचा जीआर येण्याचीही शिक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल वाचण्यासाठी [जीआरच्या प्रतीक्षेत शिक्षक’ हा लेख नक्की वाचा].

 

#MaharashtraMonsoon2025 #WeatherUpdate #IMDForecast #PuneRain #MumbaiMonsoon #KonkanRain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *