धर्माबादमध्ये शेतकऱ्यांची भीक मागून सरकारविरुद्ध जोरदार आंदोलन!
धर्माबाद (नांदेड) | २ सप्टेंबर २०२५, दुपारी १:१५ |
धर्माबादमध्ये शेतकऱ्यांची भीक मागून सरकार आणि नेत्यांविरुद्ध मोठं आंदोलन केलं आहे! नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने नद्या, नाले आणि ओढे ओसंडून वाहत होते. गोदावरी, मांजरा, हरिद्रा नद्या आणि पोचमपाडमधील श्रीराम सागरचे बॅकवॉटर यामुळे चार दिवस शेतजमीन १०० टक्के पाण्याखाली गेली, आणि शेतकऱ्यांची फळं-भाजीपाल्याची व पिकं उध्वस्त झाली.
ढगफुटी सदृश्य पावसाने उध्वस्त केलं शेतकऱ्यांचं जीवन
यामुळे धर्माबादमध्ये शेतकऱ्यांची भीक मागून सरकारविरुद्ध जोरदार आंदोलन
२७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या काळात झालेल्या जोरदार ढगफुटी सदृश्य पावसामुळे धर्माबाद तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसला. गोदावरी, मांजरा आणि हरिद्रा नद्यांचं पाणी शेतात शिरलं, तर पोचमपाडमधील श्रीराम सागरचं बॅकवॉटरही संकटात भर घातलं. संगम, मनूर, बनाळी, मंगनाळी या गावांमधील पूरग्रस्तांना गावाबाहेर हलवण्यात आलं. या संकटात पालकमंत्री अतुल सावे यांनी जवळच असलेल्या कुंडलवाडी येथे बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली, पण त्यांनी धर्माबाद तालुक्यातील जमिनीची पाहणीही न करता परत गेले. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, “नेते फक्त दिखावा करायला येतात, पण आमच्या दुखण्यावर उपाय नाही!”
धर्माबाद मध्ये शेतकऱ्यांची भीक मागून आंदोलन
या दुर्लक्षामुळे संतप्त शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टला पानसरे चौकात शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. त्यांनी हातात कटोरे घेऊन भीक मागत सरकार आणि नेत्यांविरुद्ध रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांनी “तीन खासदार असलेल्या नांदेड जिल्ह्यातील एकही नेत्याने, व नायगांव विधानसभा विद्यमान आमदार या पैकी कोणीही या शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीरतेने घेताना दिसत नाहीत.या वेळेस नांदेड जिल्ह्यातील ईतर नेत्यांवर ही टीका केली. त्यांचं म्हणणं आहे की, “या भागातला एकही लोकप्रिय आमदार किंवा मंत्री आमच्याकडे फिरकला नाही!”
शेतकऱ्यांनी सांगितलं की, सरकार आणि नेत्यांनी वेळेवर मदत देण्यासाठी काहीच पाऊल उचललं नाही. हताश झालेल्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला, “आम्ही आता भीक मागून जगावं का?” त्यांनी सरकार आणि लोकप्रतिनिधींना जागं करण्याचा प्रयत्न केला. सरकारने मदतीचं आश्वासन दिलं, पण फक्त “धीर धरा” असं म्हणून गप्प बसायला सांगितल
नेत्यांचं दुर्लक्ष आणि शेतकऱ्यांचा राग
लोकप्रतिनिधींनी या संकटात काहीच हातभार लावला नाही. विशेष म्हणजे, विधानसभा क्षेत्रात पूरपरिस्थिती आली असताना आमदार राजेश पवार हे परदेशात मौजमस्ती करत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून असंवेदनशील नेत्यांविरुद्ध आंदोलन केलं गेलं, जिथे शहरात मोठी गर्दी जमली होती.
या आंदोलनात उभाठा गटाचे जिल्हा उपप्रमुख गणेश गिरी, तालुका प्रमुख मारुति कागेरू पाटील, नारायण पाटील पवार, मनसे तालुका अध्यक्ष दत्ता कवडे, ललेश पाटिल मंगनाळीकर, वेंकटराव पाटील बाबुलगांवकर सरपंच, माधव कागडे पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले. नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
शेतकऱ्यांची मागणी काय?
आंदोलकांनी तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच दुष्काळ जाहीर करून सबसिडी द्यावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, “आमच्या सोयाबीन व इतर फळं-भाजीपाल्याचं नुकसान झालंय, पण सरकारकडून काहीच मदत नाही. आता तरी आमच्या हाकेला उत्तर द्या!”
पुढे काय?
या आंदोलनानंतर सरकार आणि प्रशासनावर दबाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी ठामपणे सांगितलं की, त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहील. तर दुसरीकडे, स्थानिक नेते आणि प्रशासन काय पाऊल उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read Also-मोफत वीज आणि कमाईची संधी! PM Surya Ghar Yojana बद्दल आजच जाणून घ्या
Read Also-afghanistan vs pakistan: पाकिस्तानने अफगाणिस्तानला धूळ चारली! T20 I तिरंगी मालिकेत 39 धावांनी दणदणीत विजय.
Read Also-पवित्र रिश्ता’ची प्रिया मराठे यांचं निधन! वयाच्या ३८व्या वर्षी कॅन्सरशी झुंज अपयशी.
शेतकऱ्यांनो, तुमचा आवाज आम्ही ऐकतो!
या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट करा आणि ही बातमी तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा!