ऑक्टोबरचा पगार दिवाळी आधी मिळेल का? माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी शासन आदेशाच्या प्रतिक्षेत!
मुंबई, १८ ऑक्टोबर २०२५: दिवाळीचा सोहळा जवळ आला की घरगुती खरेदी, सजावट आणि सणाच्या तयारीने सर्वत्र धावपळ सुरू होते. पण या आनंदाच्या वेळी माध्यमिक शिक्षण विभागातील हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न फिरतोय – ऑक्टोबरचा पगार दिवाळी आधी मिळेल का? निधी उपलब्ध झालाय, पण शासनाचा आदेश नसल्याने पगाराची प्रक्रिया रखडलीय. महाराष्ट्र राज्य शाळा कृती…