जिओचा धमाका! AI-पॉवर जिओ फ्रेम्स स्मार्ट ग्लासेस लाँच, पाहा काय काय करू शकतात!
मुंबई, 29 ऑगस्ट 2025: रिलायन्स जिओने शुक्रवारी आपल्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) एक जबरदस्त तंत्रज्ञान सादर केलं – जिओ फ्रेम्स! हे AI-पॉवर स्मार्ट ग्लासेस जे तुमच्या रोजच्या आयुष्यात डिजिटल बुद्धिमत्तेचा समावेश करणार आहेत. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी सांगितलं, “जिओ फ्रेम्स हे हँड्स-फ्री AI-पॉवर साथीदार आहे, जे भारतातल्या लोकांच्या दैनंदिन गरजा लक्षात…