kabutar khana dadar | कबूतरखाना वाद,जैन समाजाचा ‘कबुतरप्रेम’ प्रशासनाला भारी, दादरमध्ये नवा वाद सुरु!
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्रीने झाकून पूर्णपणे बंद करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादर कबुतरखाना बंद झाला, पण जैन समाजाने इमारतीच्या छतावर नवा कबुतरखाना सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिकांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा गंभीर
कबूतरखाना ताडपत्रीने झाकून पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यानंतरही स्थानिक जैन समाजाने कबुतरांना खायला घालण्यासाठी नवा मार्ग शोधल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने स्पष्ट सांगूनही – या परिसरात कबुतरांना खायला टाकू नका – हा आदेश उघडपणे धाब्यावर बसवला जात आहे.
- पूर्वी पाच किलो धान्य थेट फुटपाथवर टाकणे, कारच्या छतावर ट्रे ठेवून कबुतरांना खायला देणे अशा ‘जुगाड’ पद्धती वापरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. पण आता नवीनच वळण आलंय – कबुतरखान्यासमोरच्या जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावर अनधिकृत कबुतरखाना सुरू झाला आहे.
📍 Khabutar khana dadar छतावर हजारो कबुतरं, नागरिक हैराण
इमारतीच्या छतावर धान्याची पोती ओतली जात असल्याने तिथे हजारो कबुतरांचा थवा जमा होतो आहे. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे परिसरातील लोकांना मोठ्या आरोग्य समस्या भेडसावत आहेत. महानगरपालिकेने हाच त्रास कमी करण्यासाठी मूळ कबुतरखाना बंद केला होता. पण आता नवीन छतावरील कबुतरखाना हे प्रशासन आणि न्यायालयाला थेट आव्हान असल्याचं चित्र आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करून हा अनधिकृत कबुतरखाना बंद करावा, अशी मागणी होत आहे.
—
🚫 मराठी एकीकरण समितीला आंदोलनाची परवानगी नाही
या प्रकरणात मराठी एकीकरण समितीने कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ बुधवारी दादरमध्ये आंदोलन जाहीर केले होते. मात्र, पोलिसांनी सोमवारी रात्रीच समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून आंदोलनाची परवानगी नाकारली.
6 ऑगस्ट रोजी झालेल्या जैन आणि मारवाडी समाजाच्या आंदोलनावेळी पोलिसांशी धक्काबुक्की, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि नागरिकांना अडवणे असे प्रकार घडले होते.