रान्या राव च्या “₹१५ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणानंतरही IPS रामचंद्र राव यांची पुन्हा नियुक्ती; चर्चा रंगल्या”
‘सोने तस्करी प्रकरणानंतर मोठा बदल! अभिनेत्री रान्या राव ची सावत्र वडील IPS रामचंद्र राव यांची पुन्हा सेवेत पुनर्नियुक्ती’
कर्नाटकमध्ये चर्चेत असलेल्या सोने तस्करी प्रकरणानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री रान्या रावच्या सावत्र वडील आणि वरिष्ठ IPS अधिकारी डॉ. के. रामचंद्र राव यांची पुन्हा सेवेत पुनर्नियुक्ती झाली असून त्यांना पोलीस महासंचालक (DGP), नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालय या पदावर नेमण्यात आले आहे.
मार्चमध्ये जबरदस्ती रजेवर पाठवले होते
मार्च महिन्यात रान्या रावच्या अटकेनंतर राज्य सरकारने रामचंद्र राव यांना जबरदस्ती रजेवर पाठवले होते. आता सरकारनेसरकारने ही रजा मागे घेत त्यांच्या तात्काळ नियुक्तीचे आदेश काढले आहेत. सरकारी आदेशानुसार हे पद CID, स्पेशल युनिट्स आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस, बेंगळुरू या DGP पदाच्या समकक्ष आहे.
पुनर्नियुक्तीपूर्वी रामचंद्र राव कर्नाटक राज्य पोलीस हौसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
३ मार्च रोजी दुबईहून बेंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) रान्या रावला अटक केली. तिच्याकडून ₹१२.५६ कोटींची सोन्याच्या बिस्किटांची तस्करी पकडण्यात आली.
त्यानंतरच्या दिवशी DRI ने तिच्या बेंगळुरूतील घरावर छापा टाकून ₹२.०६ कोटींचे सोन्याचे दागिने आणि ₹२.६७ कोटींची रोकड जप्त केली. ३४ वर्षीय रान्यावर पोलीस एस्कॉर्टचा गैरवापर करून विमानतळावरील सीमाशुल्क तपास टाळल्याचा आरोप आहे.
रामचंद्र राव चौकशीत हजर
राज्य सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून, रामचंद्र राव यांचा या तस्करी प्रकरणाशी काही संबंध आहे का याची चौकशी केली. चौकशीदरम्यान राव स्वतः समितीसमोर हजर राहिले होते.