UDISE 2025 भारताच्या शिक्षण क्षेत्राने गाठला ऐतिहासिक टप्पा; शिक्षण क्षेत्राला नवी दिशा |

UDISE 2025 भारताच्या शिक्षण क्षेत्राने गाठला ऐतिहासिक टप्पा; शिक्षण क्षेत्राला नवी दिशा |

मुंबई, – 31 ऑगस्ट 2025: UDISE 2025 शिक्षकांची संख्या पहिल्यांदाच एक कोटीच्या वर; भारताच्या शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी
भारताच्या शिक्षण क्षेत्राने एक ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे. यु-डायस (Unified District Information System Of Education) UDISE 2025 च्या अहवालानुसार देशातील शिक्षकांची संख्या प्रथमच एक कोटीच्या पुढे गेलेली आहे. हा खरोखरच अभिमानास्पद क्षण आहे, कारण भारताच्या शिक्षण व्यवस्थेला नव बळ मिळणारी ही बातमी आहे.

UDISE 2025 गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शिक्षकांच्या संख्येत सात टक्क्यांची वाढ.

यु-डायस 2025 च्या आकडेवारीनुसार, देशभरातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची संख्या आता 1.02 कोटींवर वर गेलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शिक्षकांच्या संकेत सात टक्के वाढ झालेली आहे. यामागे केंद्र आणि राज्य सरकारच्या शिक्षक भरती मोहिमा, तसेच शिक्षण क्षेत्रातील सुधारणांचा मोठा वाटा आहे. विशेषतः ग्रामीण भागात शिक्षकांची उपलब्धता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं या अहवालातून दिसतोय.

UDISE 2025 शिक्षण क्षेत्राला नवी दिशा

शिक्षकांची वाढलेली संख्या ही फक्त आकडेवारी नसून, देशातील लाखो मुलांच्या भविष्यासाठी एक मोठी संधी आहे. ज्यामुळे शाळांमधील शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर सुधारेल, याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होईल. विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात याचा फायदा दिसेल. “ही वाढ म्हणजे शिक्षण क्षेत्रातील क्रांतीचा पहिला टप्पा आहे. ज्यामुळे प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचेल,”असं मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतातील शिक्षकांची संख्या 2025: देशातल्या शाळांमधल्या शिक्षकांची संख्या पहिल्यांदाच एक कोटीच्या वर गेली आहे, हे शिक्षण मंत्रालयाच्या यु-डायस रिपोर्ट मधून समोर आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत शिक्षकांच्या संकेत जवळपास सात टक्क्यांची वाढ झालीय. विद्यार्थी शिक्षक प्रमाण सुधारल्यामुळे आता प्रत्येक मुलावर जास्त लक्ष देता येईल. शिवाय, फक्त एक शिक्षक असलेल्या शाळांची संख्याही कमी झाली.

UDISE 2025: देशभरातल्या शाळांमधल्या शिक्षकांची एकूण संख्या 2024 25 मध्ये या वर्षात पहिल्यांदाच एक कोटीच्या पलीकडे पोहोचली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या UDISE 2025 च्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झालंय. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शिक्षकांच्या संकेत 6.7 टक्के वाढ झालीय, असं त्या रिपोर्ट मध्ये सांगितलं.

(Unified District Information System Of Education) UDISE 2025 – हे शिक्षण मंत्रालयाचा एक प्लॅटफॉर्म आहे. जे देशभरातल्या शाळांच्या शिक्षणाशी संबंधित आकडे गोळा करत असतो. शिक्षकांच्या संख्येतली ही लाक्षणिक वाढ विद्यार्थी शिक्षक प्रमाण सुधारण्यासाठी, चांगलं शिक्षण देण्यासाठी आणि वेगवेगळ्या भागातल्या शिक्षकांच्या कमतरते ला दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 2022-23 पासून ते आतापर्यंत शिक्षकांची संख्या सतत वाढत आहे. असं या रिपोर्टमध्ये नमूद केलेले आहे.

यु-डायस प्लस नुसार, पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थी – शिक्षक प्रमाण (PTR) आता अनुक्रमे 10, 13, 17 आणि 21 असं आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एन इ पी) ने सुचवलेल्या 1:30 प्रमाणाच्या तुलनेत यात मोठी सुधारणा झालेली आहे. ज्यामुळे प्रत्येक मुलावर वैयक्तिक लक्ष देणे सोपे होईल. शिक्षक आणि मुलांमध्ये चांगला संवाद सुधारित आणि शैक्षणिक निकालही सुधारतील असं ते रिपोर्ट म्हणतो.

 

Read Also

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *